2021-10-22

“विसर्ग” -Abandonment

P.S: ह्या घटनेतील सर्व पात्र काल्पनिक आहेत!!

मानसी: मला विशाखाला भेटायचं आहे!! एकदा तरी भेटू द्या. गेले १५ दिवस झाले मी रोज इथे येतीये. आणि तुम्ही रोज मला सांगता “कि त्यांना कोणाला हि नाही भेटायचं”

हवालदार: अहो ताई मी सांगितलं त्यांना.. पूण त्या कोणालाबी भेटायला तयार नाहीयेत.
मानसी: ठीक आहे त्यांना एक निरोप द्याल का?
हवालदार: बरं ..अस कर ताई एका कागदावर लिहून दे तुझा निरोप.
मानसी ने लगेच पर्स मध्ये हात घातला आणि एका फोटो च्या मागे तिचा निरोप लिहिला..
मानसी: हे घ्या
हवलदार: ठीक आहे देतो. आज ची भेटायची वेळ संपली आहे उद्या ये ताई
मानसी: बरं.. तेवढ नक्की द्या

हवालदार काकाने स्वतः च्या खिशात हात घातला आणि तंबाकू ची डब्बी काढली आणि फोटो जवळच्या स्टूल वर ठेवला. तंबाकू चोळत असताना त्याने फोटो कडे नीट निरखून बघितले. त्यात त्यांना
विशाखा आणि आणखी एक बाई दिसली. ती बाई साधारण दिसत होती. तेवढ्या तिकडे त्या कारागृह चे मुख्य संचालक आले..काय चाललंय कदम ? कोण होती ती मुलगी आणि काय देऊन गेली तुम्हाला ?
“काय बी ना काय बी ना” म्हणत हवालदाराने पटकन फोटो खिशात घातला आणि सलाम साहेब म्हणून तिकडून पळ काढला!

हवालदार: येडं लागणार मला ह्या बायां पायी!! जाऊदे ती पोर माया राणी एवढी होती. तिच्या खातर मी हा फोटो त्या बाईला देतो.
विशाखाला त्या कारागृहात येऊन एकच वर्ष झाले होते. ह्या पूर्वी ती दुसऱ्या कारागृहात जवळ 7-8 वर्ष होती. नुकतेच तिला तिथून हलवले होते. तिने तिथे असताना अनंत वेळा स्वतः ला मरून टाकायचा प्रयत्न केला होता.
हवालदार: ओ मॅडम ती मानसी परत आली होती आज. तुम्हाला काहीतरी देऊन गेली. इकडे ठेवतो बघा वेळ मिळेल तेव्हा बघा !!
विशाखाला बांधून ठेवले होते ..साखळ्यानें. थोडेसे पुढे येऊन विशाखाने त्या फोटो कडे बघितले. तिचा आणि संगीता चा फोटो होता तो ! तो फोटो बघून ती चिडली आणि तिने पुन्हा आरडा ओरडा चालू केला !! थोड्या वेळाने आपोआपच शांत झाली आणि फोटो उलटून बघितला!!

“तुम्ही माझी बाजू कधी ऐकली नाही ताई उगाच डोक्यात राग घालून घेतला आहे. अहो आता तरी ऐका
— संगीता”

हे कसं शक्य आहे? संगीताला मरून वर्षे उलटली. मग हे कोणी लिहिल आहे कोण हि मानसी?

मानसी: हवालदार काका आज तरी भेटू शकते का मी त्यांना?
हवालदार: थांब हा पोरी मी त्या मॅडम ला विचारून येतो ..
मानसी: थँक यु …
हवालदार: इथे बस पोरी, मी त्यांना घेऊन येतो ..जर त्या हो म्हणाल्या तर !

हवालदार कदम थोडेसे घाबरत विशाखा च्या सेल कडे जाऊ लागले.
विशाखा हि मोठ्या घरातील होती. तिचे वडील मुंबईतले एक नामांकित बिल्डर होते आणि आई एक समाज सेविका . विशाखा त्यांची एकुलती-एक मुलगी होय. त्यामुळे तिला ‘नाही’ हा शब्द माहित नव्हता. म्हणेल ते, म्हणले तेव्हा आणि म्हणेल तस तिला मिळायचा. पैश्यांची कमी नाही. म्हणूनच आई वडिलांना तिच लग्न तिला हव त्या मुलाशी लावून दिले होते. त्याची थोडी सुद्धा विचार पूस केली नाही.
तिच्या लग्नातच आई -वडिलाने सगळी इस्टेट तिच्या नवी केली. लग्नना नंतरच्या काही महिन्यातच विशाखाच तिच्या नवऱ्या सोबत पटेनास झाला. आई-वडिलांशी मात्र अजित (विशाखाचा नवरा ) चांगला वागत असे. आपल्या आई वडिलाने आपल्या साठी बरच काही केल आहे म्हणून विशाखा त्यांना तिच्या सोबत अजितच वागणे सांगत नसे. प्रेमव विवाह जरी असला तरी त्यात प्रेमच नव्हत.. मानसिक नाही आणि अर्थातात शाररिक सुद्धा नाही.
“तुझा प्रॉब्लेम काय आहे अजित ? तू एवढा कसा बदलू शकतो अरे? कदाचित तू ह्या पूर्वी हि असाच होता आणि माज्याशी प्रेमाच नाटक केलस. लग्न करण्यासाठी. माज्या वडिलांच्या इस्टेटी कडे बघून बहुदा”. “तस समज विशाखा, मला तुज्यात तीळ मात्रचा हि रस नाही” अस म्हणून बरेचदा अजित घरातून निघून जात असे. लग्नना ला ८ वर्षे उलटून गेली होती तरी त्यांना मूल झाले नाही.
आई-वडील त्यांच्या स्वतः च्या आयुष्यात गुंतले होते त्यामुळे त्यांनी हि कधी तिला विचारले नाही. सगळी बँक अकाउंट्स, लॉकर्स आणि व्यवहार विशाखा बघत असे, त्यामुळे बऱ्याच वेळा अजित पैशानं साठी तिला त्रास देत असे. खूप वेळा तिला वाटलं सुद्धा कि आपण आई-बाबाना सगळं सांगूयात. पण फायदा काय? त्यांना वाटेल मी खोट बोलतीय कारण त्यानच्या नुसार अजित तर अगदी देवा सारखा आहे. बऱ्याच वेळा तिला आपण स्वतःला संपवून टाकू असे हि वाटले. ते हि करायला तिला हिम्मत नव्हती, तेव्हा तिने आई च्या कामात मदत करूयात असे ठरवले.
विशाखाची आई हि सतत घरा बाहेर असायची ज्यामुळे विशाखाला तस बघायला गेले तर आईचे प्रेम मिळाले नव्हते. वडील हि सतत बाहेर असल्या कारणाने, आई सकाळी समाज सेवा आणि रात्री घरी पार्ट्या करीत असे. त्यामुळे तिची पहिल्यांदा काळजी करणारा आणि तिच्या कडे लक्ष देणारा फक्त अजितच मिळाला. अजित हा तिच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा.
लग्न होण्या अगोदर हि विशाखा आई सोबत त्यांच्या बंगल्या मागे असलेल्या वसाहतीत जात असे. तिकडे तिची आई तेथील बायकांना आणि मुलींना शिकवत असे. विशाखा ने ठरवले कि आपण पुन्हा आई सोबत ह्या सगळ्या गोष्टीं मध्ये लक्ष घालू यात, म्हणजे मन हि रमेल आणि काही चांगल काम हि होईल
त्याच कामात तिने स्वतः ला झोकून दिले आणि तिची प्रचिती वाढू लागली. ती खूप निष्टेने काम करू लागली त्यामुळेच तिला बरीच पारितोषिके हि मिळाली …अगदी सरकारकडून हि. बऱ्याच वेळा काही स्टेशन मधील काम असायचे तेव्हा हवालदार कदम तिला मदत करायचे आणि म्हणूनच जेव्हा मानसी ने तिचा आणि संगीताचा फोटो दाखवला तेव्हा त्यांना तिला मदत करावीशी वाटली
हवालदार: विशाखा मॅडम . अहो विशाखा मॅडम ती मानसी आली आहे . आज भेटणारका तिला ?
विशाखा : हो मामा. तिला संगीता माहित आहे.. मला बोलायचं आहे तिच्याशी .
हवालदार: ठीक आहे..चला

मानसी: आज तरी भेटू शकते का मी त्यांना?
हवालदार: मी काल विचारला त्यांना, त्या तयार आहेत तुम्हाला भेटायला. मी त्यांना घेऊन येतो तोपर्यंत तुम्ही इकडे ऑफिस मध्ये बसा.
हवालदार कदम विशाखा च्या सेल कडे गेले आणि तिला सांगितले कि मानसी आली आहे. तुम्ही भेटणार का अस विचारताच, ती तयार झाली. मामाने सेल चा दरवाजा उघडला आणि तिच्या साखळ्या हि काढल्या. ती त्यांच्या सोबत ऑफिस च्या दिशेने चालू लागली. चालताना मनात गोंधळ उडाला होता नुसता.

“कोण असेल हि मानसी ? का आली आहे मला भेटायला? संगीता ला कशी ओळखते. किती जीव लावला मी संगीता ला आणि तिने तेच केल जे त्या परिस्थितून आलेल्या मुली करतात. किळस येते ती रात्र आठवली कि. स्वतःची मुलगी म्हणून दत्तक घेतल, चांगल्या शाळेत घातला, शिकवलं, घालायला चांगले कपडे आणि फिरवायला चांगल्या गाड्या दिल्या. किती मज्जा केली आम्ही दोघींने. जगायचं हुरूप आला होता तिच्या मुळे. सगळ्या ला जणू नजर लागली. असो” अस स्वतःच्या विचारात असताना, विशाखा ला ऑफिस मध्ये एक 22-२३ वर्षाची मुलगी दिसली. बारीकशी होती आणि हातात एक प्लास्टिक ची पिशवी होती. तिच्या खांद्यावर हात ठेवून “मी विशाखा , तू कोण आणि संगीता ला कशी ओळखते ?

“ताई मी मानसी, मी आणि संगीता एकत्र वाढलो. मी ओळखते तुम्हाला, तुम्ही आमच्या वसाहतीत यायच्या आम्हाला शिकवायला. पण तुम्ही नाही ओळखणार मला. तुम्ही संगीता ला दत्तक घेतला आणि तिचा आयुष्य बद्दल. खूप आनंदात होती. सगळं सांगायची ती मला जेवहा मला भेटायला यायची. किती तरी गोष्टी आणायची, पुस्तक, वह्या, कपडे आणि एकदा तर फोन घेऊन आली माज्या साठी केव्हा हि बोलता येईल म्हणून. किती आदर होता तिला तुमच्या बद्दल. मी ना मोठी झाले कि विशाखा आई सारखी होणार” अस मानसी सांगत असताना विशाखाला स्वतः चे अश्रू अनावर झाले होते. “पण तिने मला कधी तुझ्या बद्दल नाही सांगितले” असं विशाखा ने मानसी ला विचारला. “घाबरायची ती, तुम्हाला आवडेल कि नाही वसाहतीत ली मैत्रीण म्हणून. ज्या दिवशी ती गेली त्या रात्री काय झाला हे तुम्हाला माहिती आहे आणि मला hi, पण त्या संध्याकाळी काय झाला हे फक्त मलाच माहिती आहे” असे मानसी ने सांगितले.

काय माहित नाही मला मानसी आणि काय सांगायचं आहे तिला मला? आणि कसा सांगणार ती मला ?
त्या रात्री मी तिला माज्याच गाडीने उडवून टाकल. हे सगळं जगाला माहिती आहे, मग संगीता कशी सांगणार मला अस जोरात ओरडत विशाखाने मानसीला विचारले.
मानसी त्या ऑफिस मधल्या कोपऱ्यातल्या खुर्ची कडे बघत म्हणाली, ती इथेच आहे …

निरव शांतत पसरली होती, त्या एका क्षणा साठी. विश्वास बसू नये असच झाल होते काही तरी.
“तू खोट बोलतीयेस मानसी, मला नाही वाटत अस काही असेल. तुला नक्की काय हव आहे माज्या कडून?” अस विशाखा मानसीला त्या खुर्ची कडे बघून म्हणाली.

“ठीक आहे, जे संगीताला इतक्या वर्षां पासून सांगायचं आहे ते ऐका आणि विश्वास असेल थोडासा माज्या मैत्रिणी वर तर ऐका नाहीतर जाऊद्या “. विशाखा त्या खुर्ची कडे बघतच होती. “हो आहे विश्वास आहे, सांग मला काय झाला ते”

“त्या दिवशी तुम्ही घरी येण्या अगोदर , संगीताने तुमच्या वाढदिवसाची पूर्ण तयारी केली होती. तिने तुमच्या आई-वडीलां हि फोन करून बोलावून घेतले होते. तीला घर डेकॉरटे करायला मी केली होती तिची मदत. केक ऑर्डर केला होता. अजित दादाना हि सांगितले होते. कधी नव्हे ते अजित दादा त्या दिवशी लवकर आले. मी तिथेच होते. “हि कोण आणि हि इथे काय करते?”, त्यावर संगीता ने त्यांना सांगितले कि “हि माझी मैत्रीण आहे आणि आज विशाखा आई चा बर्थडे आहे म्हणून इथे आली आहे माज्या मदतीला”
अजित दादा प्याले होते आणि ते काय बोलत होते आणि काय वागत होते ह्याची त्यांना शुद्ध नव्हती. त्याने
मला थोबाडीत मारले आणि चालती हो इथून असे सांगितले. मी रडत रडत घरातून बाहेर पडले. संगीता माज्या मागे आली होती, पण दादाने तिला घरात ओढून घेतले. त्या नंतर त्याने तिच्या सोबत ते केले जे कुठली हि 15 वर्षाची मुलगी स्वतः च्या बाबा, दादा, काका, किंवा मामा कडून अपेक्षा करणार नाही.
तुम्ही आणलेले नवीन कपडे घातले होते तिने, जे त्याने फाडले.. आणि तिच्या कोवळ्या शरीराला अमाप जखमा देत… तेच केल जे कदाचित त्याने स्वतःच्या मुली सोबत केले नसते. आणि हे सगळे सुरु असताना तुम्ही आलात …”नको ना बाबा, नको ना बाबा प्लीज जाऊदे ना बाबा ” हे तुम्ही ऐकलंत..
तुम्ही रूम मध्ये आलात आणि दादानं थोडी शुद्ध आली. कधी हि अजित दादानं वर विश्वास न ठेवणाऱ्या तुम्ही “बघ मी तुला सांगत होतो ना नको दत्तक घेऊ हिला , बघ हि मला काय करायला सांगत होती” अश्या एका खोट्या वाक्य वर विश्वास ठेवलात.

त्या वेळी तिला उराशी लावण्या ऐवजी, तुम्ही तिला थोबाडीत मारले आणि घरा बाहेर काढलेत. घरातून बाहेर पडल्यावर, संगीता ने मला फोन केला. मी तिला बस स्टॉप वर भेटणार होते. तिथे पोहचे पर्यंत, तिला गाडी ने उडविले होते आणि पोलीस तुम्हाला घेऊन चालले होते. मी तुम्हाला खूप आवाज दिला पण तुम्ही ऐकलं नाहीत. सगळे लोक गेल्या नंतर बऱ्याच वेळ संगीताचा जिथे अपघात झाला तिथे बसून राहिले. “का सोडून गेलीस मला ”

to be continued …
#mystery #abandonment

thank you for reading. Feedback is appreciated

%d bloggers like this: